अकोला - राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची जिल्हयात छुप्या मार्गाने मोठया प्रमाणात आवक आणि विक्री सुरुच असून शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने एमआयडीसीतील एका गोदामातून तसेच एक वाहन जप्त करून तब्बल १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.जिल्हयात गुटखा माफीयांच्या टोळया प्रचंड फोफावल्या असून मोठया प्रमाणात गुटख्याची उलाढाल सुरु आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनाएका वाहनामध्ये गुटखा साठा येत असल्याची माहिती मिळाली. याम ाहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून एम एच ३० ए क्रमांकाचे वाहन जप्त केले. या वाहनातील गुटखा साठा जप्त केल्यानंतर एमआयडीसी परिसरातील एका गोदामात छापा टाकण्यात आला. सदर ठिकाणावरुनही गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असून दोन्ही ठिकाणावरून तब्बल १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा गुटखा राम नामक इसमाचा असल्याची माहिती आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे व पथकाने केली.अन्न व औषधची हप्तेखोरीगुटखा साठा जप्त केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली. मात्र त्यांनी येण्याचे टाळले तर काहींनी मोबाईल फोन बंद करून ठेवले. यावरुन अन्न व औषध प्रशासन विभागाची गुटखा माफीयांसोबतच मिलीभगत असल्याचे समोर आले आहे. या कार्यालयातील गुटखा साठाही विक्री होत असल्याची चर्चा जोरात असून वरीष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.