अकोला : हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरखेड लोहारी व मुंडगाव येथे किराणा दुकानातून गुटख्याची विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्षाने रविवारी रात्री उशिरा छापा टाकून चार जणांकडून 50 हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे.
मुंडगाव येथील निलेश माणिकराव मसने यांच्या किराणा दुकानातून गुटखा विक्री सुरू होती त्यासोबतच लोहारा येथील शिवराम रुपराव डिक्कर हिवरखेड येथील विजय रसिकलाल खीलाया व बरकत खान मुर्तजा खान या चार जणांच्या किराणा दुकानातून राज्यात प्रतिबंध इन असलेल्या गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती तसेच विरोधी पक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली या माहितीवरून त्यांनी पथकासह सापळा रचून रविवारी रात्री उशिरा छापेमारी केली या चारही किराणा दुकानातून 50 हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे ही कारवाई दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांनी पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात केली.
बडे माफिया मोकाट छोट्यांवर कारवाई
शहरासह जिल्हाभरात बडे गुटखा माफिया मोकाट आहेत; मात्र संबंधित विभागाकडून केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे. यमुळे या कारवाया संशयास्पद असल्याची चर्चा आहे.