अकोला : एमआयडीसीतील ट्रान्सपोर्टच्या गोदामामध्ये राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा अवैध साठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना मिळाली. त्याआधारे पथकाने कारवाई केली असता गोदामामध्ये साडेतेरा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. पोलीस व अन्न औषध प्रशासन विभागाने शनिवारी सायंकाळी संयुक्त कारवाई करून गुटखा ताब्यात घेतला आहे.एमआयडीसीतील एका गोदामात गुटख्याचा साठा असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना मिळाली. त्यानंतर विशेष पथक व अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गोदामाची तपासणी केली असता त्यांना प्रतिबंधित गुटख्याचे १५ पोते किंमत अंदाजे साडेतेरा लाख रुपयेही आढळली. गोदाम मालक इर्शाद अहमेद अब्दुल रहेमान यांच्यावतीने तेथे चौकीदारी करणारे शेख अबरार शेख जब्बार, हसनखा करीमखा हे तेथे दिसून आले. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी अकोला येथील रामा व अमोल याचा गुटखा असल्याचे सांगितले. गुटखा गोदाम मालकाच्या सांगण्यावरून ते गुटख्याची उचल करीत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मिलिंदकुमार बहाकार तसेच अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त लोभसिंग राठोड यांनी केली.