शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
3
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
4
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
5
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
6
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
7
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
8
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
9
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
10
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
11
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
12
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
13
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
15
राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार
16
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
17
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
18
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
19
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
20
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत

हगणदरीमुक्तीचा गवगवा कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 2:00 PM

अकोला: जिल्ह्यातील गावे हगणदरीमुक्त झाल्याचा गवगवा जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ कागदावरच केला. प्रत्यक्षात गावात जाताना रुमाल बांधूनच जावे लागते.

अकोला: जिल्ह्यातील गावे हगणदरीमुक्त झाल्याचा गवगवा जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ कागदावरच केला. प्रत्यक्षात गावात जाताना रुमाल बांधूनच जावे लागते. शौचालयांची निर्मिती केवळ कागदावरच करून प्रशासनाने मोठा घोटाळा केला आहे. त्याची चौकशी तातडीने करण्याची मागणी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी गुरुवारी केली.जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. त्यावेळी अर्थ व शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्यासह सदस्य, अधिकारी उपस्थित होते.ग्रामीण भाग हगणदरीमुक्त झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये शौचालयांची निर्मितीच झाली नाही. शौचालय असले, तरी त्याचा वापर केला जात नाही, त्यामुळे गावांमध्ये जाताना नाकाला रुमाल लावूनच जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. त्याचवेळी जिल्हा परिषद प्रशासनाकडून गवगवा सुरू आहे, हा विरोधाभास असल्याचे सदस्य शोभा शेळके यांनी सभागृहात सांगितले. त्यावेळी अध्यक्ष वाघोडे यांनी बेसलाइन सर्व्हेनुसार गावे हगणदरीमुक्त झाल्याचे म्हटले. त्यावर काही सदस्यांनी शौचालय निर्मितीच्या कामात मोठा भ्रष्टाचार असल्याचे म्हटले. त्यामध्ये अधिकारी-कर्मचारीही तेवढेच दोषी आहेत. चौकशी केल्यास संपूर्ण घोटाळा बाहेर येईल, त्यासाठी चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. सोबतच हगणदरीमुक्त झालेल्या गावांमध्ये गुड मॉर्निंग पथके पुन्हा सुरू करावी, त्यासाठी नियोजन करण्याचेही सभेत सांगण्यात आले.जिल्हा परिषद हायस्कूल अडगाव येथील मुख्याध्यापक भारसाकळे यांच्यावर गैरवर्तन केल्याप्रकरणी कारवाईस प्रचंड विलंब लावला जात आहे. त्यातून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सदस्य गोपाल कोल्हे यांनी केला. त्यावर उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांनी महिनाभरात नियमानुसार कारवाई केली जाईल, असे सभागृहात सांगितले.

- उद्यानाचे ३२ लाख शेळी गटासाठी वळतेसमाजकल्याण विभागाने दलित वस्त्यांमध्ये ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, उद्यान निर्मितीसाठी तरतूद केलेला ३२ लाखांचा निधी शेळी गट वाटपासाठी वळते करण्याची सूचना अध्यक्ष वाघोडे यांनी केली. त्यानुसार ठराव घेण्यात आला.

- ८४ खेडी दुरुस्तीच्या माहितीस ठेंगा१० कोटी २० लाख रुपयांपेक्षाही अधिक निधी दुरुस्तीसाठी खर्च केल्यानंतरही ८४ खेडी योजनेतील गावांमध्ये पिण्याचे पाणी टाक्यांमध्ये पोहोचतच नाही. त्यामुळे त्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने दुरुस्ती कामांची माहिती गेल्या तीन सभांपासून मागितली जात आहे. सदस्य गोपाल कोल्हे यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. तिसरी सभा उजाडली तरीही माहिती न देता जिल्हा परिषदेला झुलवत ठेवण्याचा प्रकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सुरू आहे. विशेष म्हणजे, ८४ खेडी योजना चालविण्यासाठी जिल्हा परिषदेला कोट्यवधींचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAkola ZPअकोला जिल्हा परिषद