१७ फेब्रुवारीच्या रात्री दीड वाजताच्या सुमारास महान येथे काही वेळापर्यंत हरभराच्या आकार एवढ्या गारा पडल्या. त्यानंतर जोरदार सरी काेसळल्या . गुरूवारी सकाळी ८ वाजता या परिसरात चांगला पाऊस झाला तर वस्तापूर, झोडगा, खोपडी या भागात काही वेळेपर्यंत हरभरा एवढ्या आकाराच्या गारा पडल्याने शेतकऱ्यांचे उभ्या गव्हाचे पीक जमिनीवर झोपले. तसेच शेतकऱ्यांच्या शेतामधील हरभऱ्याच्या गंज्या (रांग) भिजल्याने प्रचंड नुकसान झाले तर गव्हाचे पीक चक्रीवादळामुळे जमिनीवर कोसळले आहे.
ग्रामीण भगात नुकतेच हरभरा सोंगणीस प्रारंभ झाला असून, महान व परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी हरभरा सोंगून रांगा मारून ठेवल्या होत्या तर अनेक शेतामध्ये हरभरा सोंगून जमिनीवर पडलेला होता. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना गंजी झाकण्याचा वेळसुद्धा मिळाला नसल्याने पाणी गंजीमध्ये शिरले आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी महान व परिसरात सर्वाधिक हरभऱ्याचा पेरा शेतकऱ्यांनी केलेला असून, हरभरा सोंगणीस प्रारंभ झालेला आहे. शासनाने महान व परिसरातील शेताचा सर्व्हे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो