अकोला: गारपिटीमुळे पश्चिम विदर्भातील हरभऱ्याचे ४० टक्क्यावर नुकसान झाले असून, दरही आधारभूत किमतीपेक्षा प्रतिक्विंटल एक हजार रुपयांनी कोसळले. या अस्मानी-सुलतानी संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.यावर्षी केंद्र शासनाने हरभऱ्याला (चणा) चार हजार रुपये प्रतिक्विंटल हमीदर जाहीर केले.यावर राज्य शासन ४०० रुपये प्रतिक्विंटल बोनस देणार आहे; पण बाजारात दर कोसळले. मागील एक महिन्यापासून या दरात सुधारणा झाली नाही. शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसल्याने शेतकºयांना शेतकºयांना बाजारातच हरभरा विकाण्याची वेळ आली आहे.पश्चिम विदर्भात रब्बी हंगामात बिगर सिंचनाचा हरभरा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. यावर्षी अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात ४ लाख २३ हजार ९२० हेक्टर १२४ टक्के हरभºयाची पेरणी झाली. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र ५० हजार हेक्टरने कमी असले तरी यावर्षी प्रतिकूल परिस्थितीत शेतकºयांनी हरभºयाची पेरणी केली. खरिपातील जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकºयांची भिस्त हरभरा पिक ावर होती; पण मध्येच आलेल्या गारपिटीने शेतकºयांच्या तोंडचा घास पळविला.अकोला कृषी उत्पन्न बाजारात आजमितीस हरभऱ्याची आवक वाढली असून, सरासरी २ हजार क्विंटल आवक सुरू आहे. बाजार बंद होताना शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी १,७७७ क्विंटल आवक झाली. या शेतकºयांना येथे प्रतिक्विंटल सरासरी दर ३,५७० रुपये मिळाले, तर प्रतवारीनुसार कमीत कमी दर ३,३५० रुपये होते.गारपिटीमुळे हरभºयाचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी प्रतवारीवारी परिणाम झाला. बहुतांश भागातील हरभरा मातीमोल झाला. असा हरभरा बाजारात अत्यंत कमी दरात खरेदी केला जात आहे.