लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन १० ते १५ मिनिटे पाऊस झाला. पावसामुळे कांदा, भुईमूग तसेच गहु पिकाचे नुकसान झाले.बोर्डी परिसरात वादळासह गारपीट झाली. वादळामुळे अकोली जहॉगीर येथे टिनपत्रे उडाली.अकोला शहरात रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ वाजता पाऊस झाला. या पावसामुळे गत काही दिवसांपासून उकाड्याचा सामना करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच बाळापूर, लोहारा,दानापूर, व्याळा, वल्लभनगर, हातरुण, बोरगाव वैराळे, तळेगाव बाजार,अंबोडा, अंदुरा, आडसुळ,कुटासा, पंचगव्हाण, अडगाव,पारस येथे वादळासह पाउस झाला. शिर्ला परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. वादळामुळे अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. शेतकऱ्यांनी सध्या कांदा पिक काढून शेतातच ठेवला आहे. तसेच भुइमूग काढणीसह सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाउस झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले.वादळामुळे फळबागांचे नुकसानअकोट तालुक्यातील बोर्डी, धारूळ ,रामापूर,कासोद शिवपूर, परिसरात रविवारी सायंकाळी वादळासह गारपीट झाली. त्यामुळे, लिंबू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच वादळामुळे फळ झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांदा, भुईमूग, गहू आदींचेही गारपीटमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सौंदळा परिसरात भुईमूग काढलेल्या शेतकºयांची एकच धावपळ उडाली. तसेच वादळामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. अकोट,बार्शीटाकळी, बाळापूर, तेल्हारा तालुक्यात अनेक ठिकाणी वादळास जोरदार पाउस झाला. पजण परिसरात वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. पिंप्री जैनपूर परिसरात निंबाच्या झाडावर वीज कोसळली. अनेक ठिकाणी विद्युत तारांवर झाडे कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता.