निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनंतर्गत असलेले खोपडी येथे वादळी पावसासोबत चांगलीच गारपीट झाली. त्यामुळे गहू, भुईमूग, हरभरा, भाजीपाल्यासह रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले, तरीसुद्धा तलाठ्याने भेटसुद्धा दिली नाही. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने जिल्हाधिकारी यांनी सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो
मास्क लावा, फटके टाळा - ठाणेदार पडघान
लोकमत न्यूज नेटवर्क
निहिदा : संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश काढून रविवारी संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत, त्यामुळे पोलिसांनी आपली गस्त वाढविली असून कोणीही विना मास्क बाहेर फिरू नये, विना मास्क फिरल्यास निश्चित फटके बसतील आणि कारवाही करण्यात येईल, त्यामुळे मास्क लावा आणि फटके व कारवाही टाळा, असे आवाहन पिंजरचे ठाणेदार एम, एन, पडघान, बिट जमादार राजू वानखडे यांनी केले आहे