खामगाव : विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर खामगाव तालुक्यातील चितोडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज, २२ सप्टेंबर रोजी छापा टाकला असता १ लाख ६९ हजारांची बनावट दारू पकडण्यात आली. यावेळी तीन आरोपींना अटक केली आहे.विधानसभेत दारुचा वाढता वापर होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाचे सक्त आदेश आहेत. या आदेशानुसार होणार्या विक्रीबाबत निवडणूक कक्षाला १ सप्टेंबरपासूनच माहिती देण्यात येत आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात दारु विक्रीवर आळा बसला आहे. परिणामी, राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली बनावट दारु बाळगणार्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आज २१ सप्टेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क बुलडाणा विभागाचे अधीक्षक डी.जी.माळी यांच्या मार्गदर्शनात व्ही.एम.पाटील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खामगाव व एन.के.मावळे दुय्यम निरीक्षक शेगाव, जवान सर्वश्री अमोल सोळंके, नवृत्ती तिडके, गणेश मोरे, मोहन जाधव यांनी मिळालेल्या माहितीनुसार चितोडा ता. खामगाव शिवारातील शेख गफ्फार शेख गफूर यांचे शेतामध्ये दारुबंदी गुन्ह्याकामी छापा टाकला असता महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली व महाराष्ट्र राज्याचा महसूल बुडवून आणलेल्या बनावट विदेशी दारुच्या १८0 मिलीच्या १0५६ शिश्या तसेच एक मोटारसायकल आढळून आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बनावट विदेशी दारू तसेच मोटारसायकल असा एक लाख ६९ हजार २00 रुपयांचा माल जप्त केला; तसेच आरोपी शे.सत्तार शे.गफ्फार (वय ३५), शे.जब्बार शे.गफ्फार (वय ३२), सै.अश्पाक अली मुमताज अली (वय १८) सर्व रा.चितोडा ता.खामगाव या तिघांविरुद्ध म.दा.का.१९४९ चे कलम ६५ क, ड ८३, १0८ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. हा प्रकार उजेडात आल्याने असे बनावट मद्य विक्रीस आणणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील तपास व्ही.एम.पाटील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खामगाव व सहकारी करीत आहेत.
दीड लाखाची बनावट दारू जप्त
By admin | Published: September 22, 2014 11:55 PM