शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अर्धा पाव अतिरिक्त साखरेतच दिवाळी!

By admin | Published: October 22, 2016 2:50 AM

स्वस्त धान्य दुकानांना दिला गरिबांसाठी कोटा; अकोला जिल्हय़ातील साडेसात लाख लाभार्थी!

संतोष येलकर अकोला, दि. २१-दिवाळी सणाच्या पृष्ठभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना दरमहा मिळणार्‍या साखरेच्या तुलनेत केवळ १५0 ग्रॅम अतिरिक्त साखर वितरित करण्यात येत आहे. याचा लाभ जिल्हय़ातील ७ लाख ५३ हजार १८५ गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना होणार आहे. दिवाळी मध्ये प्रत्येक घरामध्ये मिठाईचे पदार्थ तयार होतात यासाठी साखरेची खरेदी मोठया प्रमाणात केली जाते असे असतांना केवळ अर्धापाव साखर अतिरिक्त देऊन शासनाने गरीबांची थटटा केल्याची प्रतिक्रीया उमटत आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी (युनिट) ५00 ग्रॅम याप्रमाणे साखर वितरित केली जाते. शासनाच्या निर्णयानुसार यंदाच्या दिवाळीत बीपीएल आणि अंत्योदय गरीब शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी १५0 ग्रॅम अतिरिक्त साखर वितरित करण्यात येत आहे. म्हणजेच गरीब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना प्रतियुनिट ६५0 गॅ्रमप्रमाणे साखर वितरित करण्यात येत आहे. त्यानुषंगाने अकोला जिल्हय़ातील बीपीएल व अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक कुटुंबातील ७ लाख ५३ हजार १८५ लाभार्थ्यांना प्रत्येकी ६५0 ग्रॅमप्रमाणे साखर वितरित करण्यासाठी ३ हजार ६७८ क्विंटल साखरेचा साठा गत सप्टेंबर अखेर शासनामार्फत प्राप्त झाला. त्यानुसार पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील गरीब शिधापत्रिकाधारकांना साखरेचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये नेहमी दरमहा वितरित करण्यात येत असलेल्या साखरेसोबत १५0 ग्रॅम अतिरिक्त साखर वितरित करण्यात येत आहे. तालुकानिहाय प्राप्त साखरेचा साठा!जिल्हय़ातील बीपीएल व अंत्योदय योजनेतील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती ६५0 ग्रॅमप्रमाणे साखर वितरित करण्यासाठी ३ हजार ६७८ क्विंटल साखरेचा साठा उपलब्ध झाला. त्यामध्ये अकोला शहर व ग्रामीण भागासाठी ९0६ क्विंटल, बाश्रीटाकळी तालुक्यासाठी ३३0 क्विंटल, अकोट ९२४ क्विंटल, तेल्हारा ३९६ क्विंटल, बाळापूर ३९६ क्विंटल, पातूर ३९६ क्विंटल व मूर्तिजापूर तालुक्यासाठी ३३0 क्विंटल साखर साठा उपलब्ध झालाजिल्हय़ातील बीपीएल व अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थी शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस दिवाळीत १५0 ग्रॅम अतिरिक्त साखर वितरित करण्यात येत आहे. दरमहा वितरित करावयाची साखर आणि अतिरिक्त साखर वितरित करण्यासाठी ३ हजार ६७८ क्विंटल साखरेचा साठा उपलब्ध झाला असून, निर्देशानुसार लाभार्थ्यांना साखरेचे वितरण करण्यात येत आहे.-अनिल टाकसाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी.असे आहेत लाभार्थी!तालुका      लाभार्थी व्यक्तीअकोला       १७७१६२अकोट         १५७५५३बाश्रीटाकळी   ८५६२१बाळापूर        ११३४२१तेल्हारा          ७५५१९पातूर               ७२१0५मूर्तिजापूर        ७१८0५