- राजरत्न सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या वान सिंचन प्रकल्पातील पाण्याचा अर्धाही वापर होत नसल्याने दरवर्षी विसर्ग करावा लागत असून, यावर्षी जेवढे पाणी प्रकल्पात उपलब्ध आहे तेवढेच ८० दश लक्ष घनमीटर पाणी सोडावे लागल्याने पाण्याचा मोठा अपव्यय होत असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हा प्रकल्प २००१ मध्ये बांधून तयार झाला.या प्रकल्पाच्याची जलाशय पातळी ४११.६९ मीटर असून, यावर्षी ८०.४४ टक्के दश लक्ष घनमीटर (९८.१५ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. पर्वताच्या कुशीत असल्याने या प्रकल्पाची रचना चहाच्या कपासारखी खोल असून, या भागात हमखास पाऊस पडत असल्याने प्रत्येक पावसाळ््यात हा प्रकल्प लवकरच ओव्हरफ्लो होत असल्याने दोन-चार वर्ष सोडले तर या प्रकल्पातून हमखास पाण्याचा विसर्ग करावा लागतो. परिणामी पाण्याचा अपव्यय होत असून, यावर्षीही ८० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.विशेष म्हणजे जूनमध्येया धरणाची पातळी शून्य ठेवण्याचे नियोजन आहे. या धरणातून आजमितीस शेगाव नगर परिषद, जळगाव जामोद, १४० खेडी संग्रामपूर , ८४ खेडी, अकोट व तेल्हारा पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करण्यात येतो. मागच्यावर्षी या प्रकल्पात पाणी संचयित झाले तेव्हापासून २०१९ च्या जूनपर्यंत पिण्याच्या पाण्यावर जवळपास ३० तर सिंचनाचाठी २७.२८७ दश लक्ष घनमीटर पाण्याचा वापर करण्यात आला. असे असूनही २१ दश लक्ष घनमीटरच्यावर पाणी या प्रकल्पात शिल्लक होते.मागील दहा वर्षांची पाणी वापराची आकडेवारी बघितल्यास उपलब्ध जलसाठा पुर्ण वापरलाच नसल्याचे आकडेवारीवरू न समोर येत आहे. २००१ मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर २००२-२००३ मध्ये ७१.५२६ दशलक्ष घनमीटर पाणी संचय झाला होता. त्यावर्षी ४,५९६ हेक्टरवर सिंचन करण्यात आले. त्यावेळी ४.६ दलघमी पाणी पिण्यासाठी वापरण्यात आले.
वान प्रकल्पात दरवर्षी५० टक्के जलसाठा शिल्लक राहत असून, पाणी शून्य ठेवण्याचे नियोजन आहे. यावर्षी प्रकल्पात जेवढे पाणी आहे तेवढ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पाण्याचा वापर सिंचनासाठी करावा.- अनिकेत गुल्हाने,सहायक अभियंता श्रेणी-१वान प्रकल्प.