सेनेच्या साप्ताहिक समाराेपीय आंदाेलनात पक्षाचे संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख उपस्थित हाेते.
केंद्र सरकारने इंधनाच्या दरात वाढ केल्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवर झाला आहे. घरगुती गॅसचे दर वाढवल्याने काेराेनाच्या संकट काळात सर्वसामान्य नागरिकांसमाेर अनेक समस्या निर्माण झाल्याचा आराेप करीत सेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी मागील सात दिवसांपासून केंद्र शासनाच्या विराेधात शहराच्या विविध भागात अभिनव आंदाेलन छेडले. या आंदाेलनाची सांगता शुक्रवारी गांधी चाैकात करण्यात आली. यावेळी रेखा राऊत, वर्षा जाेशी, नंदा गाडे, संगीता राठाेड, मंदाकिनी कीर्तीवार, उज्ज्वला कीर्तीवार, निर्मला सराेदे, दुर्गा गायधने, माया जीने, मुस्कान परविन, साबीया बि, साफीया बि, जुनेदा बि, नीतू लाेखंडे, शाहीन बि, द्वारका वाघमारे, अरुणा डाखाेरे, नंदा तायडे, बबिता लाेखंडे, कामिनी मुंडे, बबिता बेतवाल, वर्षा मेहरे, लीला देव, अंजली दुबे, शीतल वैष्णव, लक्ष्मी कठाेरे, रेखा शिरसाट, शशिकला कांबळे, शांता वानखडे, सुनीता करंडे, पद्मा कांबळे, बेबी इंगळे, कमला हिवराळे, साधना डहाळे, सुनीता पांडे, कांता मडावी, तारामती रायके, सया काेकाटे यांसह पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित हाेते.