--------------------------
पातुरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत सायकल रॅली
पातूर : न.प.तर्फे शहरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीद्वारे प्रदूषण नियंत्रण करण्याच्या हेतूने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. सायकल रॅलीची सुरुवात न. प. कार्यालयातून झाली होती. शहरातील प्रमुख मार्गांनी फिरवून पुन्हा न.प. कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी न. प. मुख्याधिकारी सोनाली यादव, उपाध्यक्ष सै. एहफाजोद्दीन, मो. फैज, वर्षा बगाडे, तुळसाबाई गाडगे, न.प. कर्मचारी क्षिप्रा लोणारे, महेश राठोड, दीपक सुरवाडे, गजानन पाटील, मो. गझिऊर रहेमान, शेख यासीन, उज्ज्वल भरणे, संतोष तेलंगडे, संतोष भगत, विनोद माहुलीकर, देवेंद्र ढोणे, एनोद्दिन, बंडू पाटील, मो. लुकमन, से. अख्तर, प्रकाश फुलारी, प्रमोद अंभोरे, ईश्वर पेंढरकर, शालिनी ठक आदी उपस्थित होते. (फोटो)
------------------------
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित
बार्शिटाकळी: गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित सापडला आहे. हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळींच्या नियंत्रणासाठी शेतकरी फवारणी करीत असल्याचे चित्र आहे.
---------------------------
तिवसा येथे मराठा समाज विकास मंडळाची बैठक
तिवसा : येथील अशोक लुले यांच्या शेतात मराठा घाटोळे पाटील समाज विकास मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये मंडळाच्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी दिलीप नानोटे, आमदार अमित झनक उपस्थित होते. याप्रसंगी भाऊसाहेब कपले, नारायण बारड, रमेश बेटकर, प्रशांत बोथे, रावसाहेब राहणे आदी उपस्थित होते.
----------------------------
करतखेडा मार्गावर दर्शनी फलकाची मागणी
करतखेडा : दर्यापूर-अकोला मार्गावरील करतखेडा परिसरात दर्शनी फलक बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. करतखेडा परिसरात दर्शनी फलकांचा अभाव असल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, त्यामुळे दर्शनी फलक बसविण्याची मागणी होत आहे.
----------------------
हातरुण परिसरात हरभऱ्याचा पेरा घटला!
हातरुण : यंदा चांगला पाऊस झाल्याने तलाव, विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे, त्यामुळे यंदा रब्बी हंगामात पेरणी क्षेत्र वाढले आहे; परंतु हातरुण परिसरात हरभऱ्याचा पेरा घटल्याचे चित्र आहे.
------------------------------
हातरुण-बोरगाव वेैराळे रस्त्याची दुरवस्था!
हातरुण : परिसरातील हातरुण-बोरगाव वैराळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
---------------------------
अकोट शहरात कचऱ्याचे ढीग!
अकोट : शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सफाई कामगारांनी नालीच्या साफसफाईनंतर कचऱ्याचे ढीग रस्त्यावर फेकले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचरा उचलण्यासाठी लाखो रुपयांचा कंत्राट देऊनही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.
----------------------------
जलवाहिनीचे काम सुरू; रस्त्यांचे खोदकाम
अकोट : शहरात विविध प्रभागांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्यांचे खोदकाम केले जात असल्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाल्याने नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
------------------------
तेल्हारा शहरात मुख्य रस्त्याची दुर्दशा
तेल्हारा : शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. तसेच शहरातील रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.