लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कधीकाळी खेळल्या जाणाºया भोवरा आणि भिंगरीसारख्या खेळणीची जागा महागड्या स्पीनरने घेतली असून, अकोल्यापासून मुंबईपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये ‘हॅण्ड स्पीनर’ नावाच्या खेळणीने नवीन क्रेझ निर्माण केली आहे. गत दोन महिन्यांपासून शालेय विद्यार्थ्यांमध्ये हॅण्ड स्पीनरची क्रेझ वाढली असून, क्रीडा साहित्य आणि खेळण्याच्या दुकानात महागडे हॅण्ड स्पीनर दाखल झाले आहेत.दहा-पंधरा वर्षांआधी शालेय विद्यार्थ्यांमध्ये भोवरा, भिंगरीसारखे खेळ नियमितपणे खेळले जायचे. त्या वयात त्या खेळांचे आकर्षण राहायचे. काळाच्या ओघात भिंगरी आणि लाकडी भोवºयासारखे खेळ मागे पडत गेले. गावातील खेळ म्हणून एका वर्गाने या खेळांना नाकारले, त्यामुळे कमी खर्चाचे देशी खेळ कालबाह्य झाले; मात्र या खेळांच्या जागा आता हळूहळू इतर खेळणी घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. हॅण्ड स्पीनर नावाची खेळणी नवीन रूपात बाजारात आली असून, शालेय विद्यार्थ्यांना या खेळाने वेगळीच भुरळ घातली आहे. आधीच्या खेळणीपेक्षा अलीकडच्या खेळणीत फारसा बदल नसला, तरी ही खेळणी इंटरनेट, सोशल मीडियाच्या माध्यमातून नवे रूप आणि नवे नाव घेऊन दाखल होत आहे. बेरिंग असलेल्या स्पीनरचे अनेक प्रकार बाजारात आले असून, तीन, चार, पाच, सात टोकाचे रंगबिरंगी विविध आकाराचे स्पीनर मुलांसाठी लक्षवेधी ठरत आहेत. चाळीस रुपयांपासून तर लाखो रुपयांपर्यंतच्या स्पीनरने बाजारपेठ गाठली आहे. शालेय विद्यार्थ्यांमधून मोठ्या प्रमाणात स्पीनरची मागणी वाढल्याने अकोल्यातील अनेक क्रीडा साहित्य आणि खेळण्यांच्या दुकानात स्पीनर दाखल झाले आहेत.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये ‘हॅण्ड स्पीनर’ची क्रेझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:37 AM
अकोला : कधीकाळी खेळल्या जाणाºया भोवरा आणि भिंगरीसारख्या खेळणीची जागा महागड्या स्पीनरने घेतली असून, अकोल्यापासून मुंबईपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये ‘हॅण्ड स्पीनर’ नावाच्या खेळणीने नवीन क्रेझ निर्माण केली आहे.
ठळक मुद्देभिंगरी-भोव-याची जागा घेतली महागड्या स्पीनरने