अकोला : हैदराबाद येथे पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिला जिवंत जाळण्याºया आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशा मागणीचे निवेदन मातोश्री परिवारातर्फे शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.मानवतेला काळिमा फासणारी व संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारी घटना हैदराबाद येथे घडली. त्या महिला डॉक्टरवर चौघांनी अत्याचार करून जिवंत जाळले. या घटनेचा देशभरात निषेध करण्यात येत आहे. अकोल्यातही त्याचे पडसाद उमटत असून, विविध संस्था, संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देतेवेळी मातोश्री मित्र परिवाराचे अध्यक्ष योगेश ढोरे, उदय घोगरे, रूपेश ढोरे, ओम कुचर, महेश बांभुरकर, राजाभाऊ शिरसाट, ओम सोनोने, प्रवीण श्रीवास्तव, सुनील गीते, शुभम वाकोडे, हरीश बोंडे, अक्षय नागरकर, प्रवीण मानकर, अच्युत गावंडे, चंद्रकांत खेडकर, दीपक काटे, आदित्य वानखडे, ऋषिकेश गावंडे, हरीश चंदेल, प्रतीक काळे, अक्षय लिखार, शुभम ढोरे, चेतन तोडकर, नागेश इंगळे, पवन भोसले, नीलेश ठाकरे, निखिल साबळे, नितीन जुनारे, सागर भिरड, अक्षय मते, सागर बावस्कर, शुभम दांदळे, सुधीर शिंदे यांच्यासह इतर सदस्यांची उपस्थिती होती.