आयुष डॉक्टरांकडून निर्णयाचे स्वागत
बीएमएस डॉक्टरांना नाही, तर तीन वर्षांचा पदव्युत्तर पदवी घेतलेल्या एमएस आयुर्वेद डॉक्टरांना अधिकृत परवानगी मिळाली आहे. या निर्णयाचे स्वागत आहे; परंतु आयएमएचा विरोध चुकीचा आहे. निर्णयासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पंतप्रधान यांना अभिनंदनाचे पत्र दिले आहे.
- डॉ. ज्योती कोकाटे, अध्यक्ष, निमा, अकोला.
आयएमएच्या डॉक्टरांनी चुकीचा अर्थ काढला आहे. ज्यांनी आयुर्वेदमध्ये एमएस केले आहे त्यांनाच ही मान्यता मिळाली आहे. आयएमएमार्फत हा चुकीचा प्रचार केला जात असून, ते चुकीचे आहे. शासनाच्या निर्णयाचे स्वागत आहे.
डॉ. अरविंद गुप्ता, सचिव, निमा.
शासनाच्या निर्णयाचे स्वागत असून, याला आयुष डॉक्टरांचा विरोध नाही. आयएमएतर्फे शासनाच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावण्यात येत असून, तसा प्रचार केला जात आहे.
डॉ. सुनील लुल्ला, कोषाध्यक्ष, निमा, अकोला.
ॲलोपॅथी डॉक्टरांचा निर्णयाला विरोध
आयएमए कोणत्याही पॅथीच्या विरोधात नाही. शस्त्रक्रिया हा नाजुक विषय आहे. चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाल्यास त्याचा सर्वाधिक त्रास रुग्णाला होणार आहे. त्यामुळे आयएमएचा विरोध सासनाच्या धोरणाला आहे. - डॉ. पराग डोईफोडे, आयएमए, अकोला.
विरोध आयुर्वेदाला नाही. आयुर्वेदाचा विकास व्हायलाच हवा; परंतु शस्त्रक्रियेला मान्यता देणे कितपत योग्य, हा सशोधनाचा विषय आहे. जोपर्यंत योग्य प्रशिक्षण नाही, तोपर्यंत त्यांना शस्त्रक्रियेला मान्यता नसावी.
- डॉ. रणजित देशमुख, आयएमए,अकोला.
विरोध हा आयुष डॉक्टरांना नाही, तर शासनाच्या धोरणाला आहे. शस्त्रक्रिया ही नाजूक बाब असून, याचा सर्वाधिक धोका रुग्णाला आहे. शस्त्रक्रियेसाठी अभ्यास असणे आवश्यक आहे.
- डॉ. अमोल केळकर, आयएमए,अकोला.
नवीन कायद्याचा फायदा
या निर्णयामुळे आयुर्वेद एमएस डॉक्टरांना स्थानिक प्रशासनाकडून शस्त्रक्रियेसाठी आवश्यक परवानगी घेणे सोपे होणार आहे, तसेच आयुष डॉक्टरांच्या मते ग्रामीण भागात कमी खर्चात रुग्णांवर शस्त्रक्रिया शक्य होणार आहे.
नवीन कायद्याचा तोटा
शस्त्रक्रिया हा नाजूक विषय असून, त्याचा योग्य अभ्यास असणे आवश्यक आहे. आयएमएच्या मते अर्धवट अभ्यास असलेल्या व्यक्तीस शस्त्रक्रियेची परवानगी देणे हे रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.