लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शहरातून वाजतगाजत भव्य कावडयात्रा काढण्यात आली. या कावड यात्रेमध्ये २२ शिवभक्त मंडळांचा सहभाग होता. उत्सवात मोठय़ा संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. शिवभक्तांनी कावडीद्वारे आणलेल्या जलाने बहुतांश मंडळांनी तपेश्वरी मंदिरातील शिवलिंगाला, तर काहींनी श्री नंदिकेश्वराला जलाभिषेक केला. श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी (१४ ऑगस्ट) गांधीग्राम येथून पूर्णा नदीचे जल घेऊन आलेल्या शिवभक्तांची कावड यात्रा स्थानिक अकोला नाका येथून सकाळच्या सुमारास प्रारंभ झाली. कावड यात्रेतील पालखींवर शिवभक्त मंडळांद्वारे आकर्षक सजावट केली होती. अनेक कावडांवर भगवान शंकर, नंदी, श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान व गजानन महाराज आदींच्या आकर्षक मूर्तींची आरास करण्यात आली होती. त्यांचे ठिकठिकाणी महिला-पुरुष भाविकांनी पूजन करून दर्शन घेतले. अनेक शिवभक्त मंडळांनी सामाजिक विषयांवर संदेश देणारे देखावे तयार करून जनजागृती केली. काही मंडळांनी मल्लखांबावरील चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केलीत. यावेळी पारंपरिक ढोलताशे, बँड पथक आदींचा मिरवणुकीत सहभाग दिसून आला. श्रावणमास कावड उत्सवात गणपती मंदिर मंडळ, पंचमुखी शिवभक्त मंडळ यात्रा चौक, शिवभक्त मंडळ शनवारा ग्रुप, तपेश्वरी कावड मंडळ भवानीपुरा, जय भवानी क्रीडा मंडळ रामटेकपुरा, श्रावणबाळ कावड मंडळ बारगण, जयशक्ती शिवभक्त मंडळ दखनी फैल, नव हिंद ग्रुप यात्रा चौक, नंदिकेश्वर मंडळ नंदिपेठ, क्रांती ग्रुप महात्मा सोमवार वेस, जय भोले डोहरपुरा, नाथुबाबा मंडळ टाकपुरा, भयानक शिवभक्त मंडळ कुंभारवाडी, वीरसंग्राम मंडळ, छावा शिवभक्त मंडळ, जय ग्वाला ग्रुप, वीर लहुजी बारगण, वीर शिवभक्त कावड मंडळ, जय महारुद्र शिवभक्त मंडळ, शिवशक्ती मंडळ शनवारा, मोरया शिवभक्त मंडळ गोवारीपुरा, जय गजानन कावड मंडळ गजानननगर आदी मंडळ सहभागी झाले होते. भगवान महादेवावर रचित गीतांवर तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शहरातील शिवाजी चौक, सोनू चौक, यात्रा चौक, कालंका चौक, सावरकर चौक मार्गे सोमवार वेस, मोठे बारगण, गोलबाजार, सराफ बाजार मार्गे सायंकाळदरम्यान श्री तपेश्वरी मंदिर, तर काही मंडळांनी नंदिकेश्वर मंदिरातील शिवलिंगाला जलाभिषेक केला.
हर्र बोला.. चा गजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 1:24 AM
अकोट : श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शहरातून वाजतगाजत भव्य कावडयात्रा काढण्यात आली. या कावड यात्रेमध्ये २२ शिवभक्त मंडळांचा सहभाग होता. उत्सवात मोठय़ा संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. शिवभक्तांनी कावडीद्वारे आणलेल्या जलाने बहुतांश मंडळांनी तपेश्वरी मंदिरातील शिवलिंगाला, तर काहींनी श्री नंदिकेश्वराला जलाभिषेक केला.
ठळक मुद्देतपेश्वरी, नंदिकेश्वर मंदिरात शिवभक्तांनी केला जलाभिषेकसामाजिक संघटनांकडून स्वागत