लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हरिहरपेठमधील एका घरात अज्ञात चोरट्यांनी दीड लाख रुपयांची घरफोडी केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.हरिहरपेठेतील दसरा नगरातील रहिवासी गजानन सोनोने हे परिवारासह नांदुरा येथे गेले होते. ते शुक्रवारी रात्री घरी परत आल्यानंतर घराचे प्रवेशद्वार तुटलेले दिसले. त्यांनी आतमधील साहित्य व रोख रकमेची पाहणी केली असता कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. यासोबतच ३0 ग्रॅम सोन्याचे दोन मंगळसूत्र, पन्नास ग्रॅम चांदीचे पाच शिक्के, दोन ग्रॅमचे दोन सोन्याचे शिक्के व ७0 हजार रुपये रोख असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. सोनोने यांनी जुने शहर पोलीस स्टेशनला या प्रकरणाची तक्रार दिली असून, पोलिसांनी घटनास्थळ पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
हरिहरपेठमध्ये दीड लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2017 2:16 AM