राज्यात प्रती हेक्टरी पिकांच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय पीक स्पर्धेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात निश्चित केलेल्या क्षेत्रात पिकांचे प्लाॅट टाकण्यात आले आहेत. त्यामध्ये रब्बी हंगामात कापणीला आलेल्या हरभरा, गहू आदी पिकांची कापणी तसेच तयार होणाऱ्या पिकांच्या उत्पादनाची पडताळणी करण्याचे काम गावनिहाय समित्यांच्या उपस्थितीत संबंधित कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व कृषी मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकांकडून सद्यस्थितीत सुरू आहे. त्यामध्ये सर्वाधिक पिकाचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांची तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पीक स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.
प्रती हेक्टरी पिकांच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी पीक स्पर्धा उपक्रम राबविण्यात येत आहे. पीक स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांच्या पिकांची कापणी आणि पीक उत्पादनाच्या पडताळणीचे काम सद्यस्थितीत सुरू आहे.
शंकर तोटावार
प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती