विझोरा(जि. अकोला): वन्य प्राण्यांकडून शेतात पेरलेल्या तूर बियाण्याची नासाडी करण्यात येत आहे. रानडुक्कर या वन्य प्राण्याकडून शेतात पेरलेल्या तूर पिकाच्या बियाण्याची रात्रीच्या वेळी उकरून पीक उद्ध्वस्त केल्या जात आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्यांनी खरीप तूर या पिकाला पसंती दिली आहे. बहुतेक सर्वच शेतकर्यांनी सोयाबीन, कापूस, मूग या पिकाबरोबर आंतरपीक म्हणून तुरीचा पेरा केला आहे; परंतु वन्यप्राणी रानडुकरांकडून रात्रीच्या वेळी तूर पीक बियाण्याची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याचे चित्र आहे. आधीच शेतकरी दुष्काळाने होरपळलेला असताना कर्ज, उसनवार करून कशीबशी पेरणी केली; परंतु वन्यप्राणी डुकरांमुळे रडकुंडीस आणले आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील वनक्षेत्रात हे प्रकार सर्रास सुरू आहेत.
वन्य प्राण्यांकडून पिकाची नासाडी
By admin | Published: June 28, 2016 11:00 PM