अकोला: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी एकही अर्ज दाखल झाला नाही. चौथ्या दिवशी माजी आमदार डॉ.जगन्नाथ ढोणे, भारिप- बहुजन महासंघाचे मोहम्मद युसूफ मो.शफी यांच्यासह पाच उमेदवारांनी ११ अर्ज घेतले. अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्जांचे वितरण व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २ डिसेंबरपासून अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात सुरू झाली. ९ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा चौथा दिवसही कोरा ठरला. दरम्यान, शनिवारी माजी आमदार डॉ.जगन्नाथ ढोणे यांनी ३, भारिप-बमसंचे कारंजा लाड येथील मोहम्मद युसूफ मो.शफी पंजवाणी यांनी ३, वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे यांनी २, मानोरा येथील काँग्रेसचे प्रकाश राठोड यांनी २ आणि अकोल्याचे अपक्ष पंकज देशमुख यांनी १ असे एकूण पाच उमेदवारांनी ११ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहातून घेतले.
ढोणे, मो. युसूफसह पाच उमेदवारांनी घेतले ११ अर्ज
By admin | Published: December 06, 2015 2:11 AM