लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली वॉटर कप स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच र्मयादित राहिली नाही, तर या स्पध्रेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे. या स्पर्धेसाठी अभिनेता आमिर खान याने २३ एप्रिल रोजी खंडाळा येथे भेट देऊन श्रमदान केले. त्याच्या या कर्तृत्वाने श्रमदानच ‘अमीर’ झाले असून, ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे. ग्रामस्थांचे श्रम, आवश्यक साहित्यासाठी दानशुरांची मदत व पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे ज्ञान, अशी त्रिसूत्री या स्पध्रेची असून, या स्पध्रेमुळे जलसंधारणाचे नवे पर्व राज्यात सुरू झाले आहे. या स्पर्धेत सहभाग घेणार्या गावातील श्रमदानाची दखल घेत अभिनेता आमिर खान भेट देत असतो. गेल्या वर्षी आमिर खान यांनी ९ मे रोजी पातूर तालुक्यातील चारमोळी आणि शिर्ला येथे भेट दिली होती. या दोन्हीही गावांना पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षीही अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान सुरू आहेत. जिल्ह्यात श्रमदानाची चळवळ रुजत असतानाच आमिर खान याने खंडाळा येथे केलेल्या श्रमदानामुळे ग्रामस्थांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोमवारी सायंकाळी आमिर खान यांचे आगमन होताच, श्रमदान करणार्यांचा उत्साह वाढला. तेथे उपस्थित प्रत्येकाने आपल्या हातात टिकास, फावडे, टोपले घेऊन श्रमदान केले. आमिर खान यांच्या आजच्या कृतीने श्रमदानाला त्यांनी ‘अमीर’ केल्याचा भास झाला. आमिर खान यांनी श्रमदात्यांबरोबर १0 ते १५ मिनिटे श्रमदान केले. यावेळी आमिर यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी किरण राव यांनीही श्रमदानात सहभाग घेतला.
..अन त्याने श्रमदानाला ‘अमीर’ केले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 2:07 AM
अकोला : सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली वॉटर कप स्पर्धा केवळ जलसाक्षरता अन् जलजागृतीपुरतीच र्मयादित राहिली नाही, तर या स्पध्रेतून सांघिक भावना, श्रमदानाचे महत्त्व वृद्धिंगत झाले आहे. या स्पर्धेसाठी अभिनेता आमिर खान याने २३ एप्रिल रोजी खंडाळा येथे भेट देऊन श्रमदान केले. त्याच्या या कर्तृत्वाने श्रमदानच ‘अमीर’ झाले असून, ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे.
ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथे केले श्रमदान