चिखली (बुलडाणा) : शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत देण्याकरीता तीनशे रूपयांची लाच घेताना चिखली तालुक्यातील भोकर येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोतीराम धनसिंग निंबोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली. भोकर येथील रामेश्वर बंडू नेवरे यांना शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत हवी होती. त्यासाठी त्यांनी २८ जानेवारी रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेचे कार्यरत मुख्याध्यापक मोतीराम निंबोळे यांची भेट घेतली असता, त्यांनी दाखल्यासाठी तीनशे रूपयांची मागणी केली. या प्रकाराबाबत रामेश्वर नेवरे यांनी बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार तातडीने सापळा रचून, मुख्याध्यापक निंबोळे यांना शाळेतील मुख्याध्यापक कक्षात रामेश्वर नेवरे यांच्याकडून ३00 रूपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
मुख्याध्यापकास 300 रुपयांची लाच घेताना अटक
By admin | Published: January 28, 2015 11:34 PM