अकोला : नागरिकांना संभाव्य आजारापासून वाचविण्यासाठी पंतप्रधान आयुष्यमान योजनेअंतर्गत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रांगणात आयोजित दोन दिवसीय आरोग्य मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी जिल्हाभरातून आलेल्या साडे सात हजारावर नागरिकांच्या विविध आरोग्य चाचण्या करण्यात आल्या. खासदार संजय धोत्रे यांच्या पुढाकाराने आयोजित या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधिर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. खिल्लारे, उपसंचालक आरोग्य डॉ. फारूखी, शासकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या अधिक्षीका डॉ. आरती कुरवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी काश्मिर येथील भ्याड हल्यात शहिद झालेल्या जवांनाना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आरोग्य उपसंचालक डॉ फारूखी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी महापौर सुमनताई गांवडे , नगरसेविका गितांजली शेगोकार, सारिका जयस्वाल , डॉ. विनोद बोरडे , महानगरपालिकाचे नगरसेवक , नगरसेविका तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात , महानगराध्यक्ष किशोर मांगटेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले. तर संचालन अॅड. शुंभागी खोंडे यांनी केले.मल्टिस्पेशालिटी सुविधाया मेळाव्यात कर्करोग, ह्दयरोग, मधुमेह, मोतीबिंदू, किडनीचे उपचार , मेंदूरोग, व इतर दुर्धर आजारावर तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. यासाठी सर्वोपचार रूग्णालय व शासकीय वैदयकीय महाविदयालय येथे सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविदयालय , सर्वोपचार रूग्णालय , आयएमए , निमा आदींचे ८२ ४ डॉक्टरांच्या सेवा घेण्यात आलेल्या आहेत. स्त्रीयांचे स्तन कर्करोग व गभार्चा कर्करोग यासाठी मॅमोग्राफी सुविधा तसेच एक्स रे, सोनोग्राफी,विविध चाचण्यांसाठी पॅथोलॉजीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एमआरआयसुध्दा काढुन दिला जाणार आहे. ह्दय रोगासाठी इको कार्डीओग्राफीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच रुग्णांसाठी औषधीही उपलब्ध करुन दिली आहेत. यासाठी औषधीचे स्टॉल लावण्यात आले आहेत.