अकोला : लोकांमध्ये आरोग्यदायी सवयी व स्वच्छतेची आवड निर्माण होऊन स्वच्छता ही जीवनशैली बनावी या उद्देशाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ ते १५ एप्रिल दरम्यान ‘स्वच्छता से सिद्धी’ हा पंधरवडा साजरा करण्यात येत असून, आरोग्य विभागामार्फत या पंधरवड्यात ग्रामीण व आरोग्य केंद्र स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१ तारखेला आरोग्य संस्थांच्या ठिकाणी पंधरवड्याचे उद्घाटन स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. २ ते ९ तारखे दरम्यान गावांमध्ये श्रमदान, आरोग्य संस्थास्तरावर रुग्णांमध्ये जनजागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रात्यक्षिक, नुक्कड नाटक व लोक कला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामध्ये आरोग्यदायी प्रवृत्ती, आरोग्यदायी सवयी व आरोग्यदायी जीवनशैली या घटकांवर आधारित उपक्रमांद्वारे जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येणार आहे. १० एप्रिल रोजी स्वच्छता उपक्रम राबविताना येणारे अनुभव, आव्हाने व नवनवीन कल्पना याबाबत आदान-प्रदान करण्यात येणार आहे. ११ ते १४ एप्रिल दरम्यान आरोग्य संस्थास्तरावर व सामाजिकस्तर या दोन स्तरावर उपक्रम राबविण्यात येणार आहे. आरोग्यसंस्थास्तरावर स्वच्छतेचे आॅडीट, स्वच्छ कार्यालय, स्वच्छ वार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच रक्तदान, अवयवदान व आरोग्य शिबीरांचेही आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक स्तरावर हगणदारीमुक्त गाव, स्वच्छ शाळा, स्वच्छ अंगणवाडी, कचऱ्याचे व्यवस्थापन, वैयक्ति स्वच्छता आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. १५ एप्रिल रोजी संपूर्ण अभियानातील अनुभव व आव्हाने याबाबत ग्रामसभेच्या माध्यमातून गावकºयांना माहिती देण्यात येणार आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.एम. राठोड यांनी केले आहे.
‘स्वच्छता से सिद्धी’ पंधरवड्यात स्वच्छतेचा जागर; आरोग्य विभागाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 3:09 PM
अकोला : लोकांमध्ये आरोग्यदायी सवयी व स्वच्छतेची आवड निर्माण होऊन स्वच्छता ही जीवनशैली बनावी या उद्देशाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ ते १५ एप्रिल दरम्यान ‘स्वच्छता से सिद्धी’ हा पंधरवडा साजरा करण्यात येत असून, आरोग्य विभागामार्फत या पंधरवड्यात ग्रामीण व आरोग्य केंद्र स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे१ तारखेला आरोग्य संस्थांच्या ठिकाणी पंधरवड्याचे उद्घाटन स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.२ ते ९ तारखे दरम्यान गावांमध्ये नुक्कड नाटक व लोक कला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान, अवयवदान व आरोग्य शिबीरांचेही आयोजन करण्यात आले आहे