अकोला - भारतीय सेवा सदनद्वारा संचालित अकोल्यातील एका महिला महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये काम करणार्या एका रोजंदारी युवकास कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याचा लैंगिक छळ करणारे संस्थेचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका व जुगलकिशोर रुंगटा यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. या दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज अकोल्याच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला होता.
आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
By admin | Published: July 22, 2015 10:59 PM