अकोला: केरळमधील उच्च न्यायालयाचे नवृत्त न्यायाधीश तथा राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बन्नू मरठ आणि आयोगाचे सदस्य बी.डी. मोरे यांनी गुरुवारी बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ातील विविध विभागांतर्गत मानवाधिकार उल्लंघनसंबंधी तक्रारींवर सुनावणी घेतली. यावेळी अकोला जिल्ह्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते. तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकार्यांचे मत नोंदविण्यात आले.
मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारींवर सुनावणी
By admin | Published: July 10, 2015 1:30 AM