आकोट (जि. अकोला) : आकोट येथे ९ सप्टेंबर रोजी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, हिवरखेड मार्गावर निंबाचे झाड कोसळून चार जण जखमी झाले. दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असून, अधून-मधून पाऊस कोसळत आहे. ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास वादळीवार्यासह पाऊस झाला. दरम्यान, हिवरखेड मार्गावरील निंबाचे झाड शेजारी असलेल्या हॉटेल, टिंबर मार्ट व एका पानपट्टीवर कोसळले. या घटनेत देवीदास चिंचोळे, किशोर जाफ्राबादी व अन्य दोन जण जखमी झाले.
आकोट येथे मुसळधार पाऊस
By admin | Published: September 10, 2015 1:53 AM