लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला जिल्ह्यात २३ जून रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ५.३0 वाजताच्या दरम्यान बाश्रीटाकळी तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडला. याप्रमाणेच अकोला शहरासह परिसरातील काही गावांत व पातूर तालुक्यातील शिर्ला येथे दुपारी ४ वाजतानंतर काही वेळापर्यंंत पावसाच्या सरी कोसळल्या. बाश्रीटाकळी तालुक्यातील बाश्रीटाकळी शहर, सिंदखेड, महान, धाबा, एरंडा, जलालाबाद, राजनखेड, विझोरा, पिंजर यासह अनेक गावांत शुक्रवारी दुपारी ४ वाजतापासून ते ५.३0 वाजेपर्यंंंत जोरदार पाऊस पडला. अकोला शहरासह परिसरातील काही गावांमध्ये पावसाच्या सरी दुपारी ४ वाजतानंतर काही वेळासाठी कोसळल्या. पातूर तालुक्यातील शिर्ला येथे दुपारी ४ ते ४.१५ या काळात चांगला पाऊस पडला. या पावसामुळे बाश्रीटाकळी तालुक्यात पावसाअभावी आतापर्यंंंत खोळंबलेल्या पेरण्या आता सुरू होतील. शेतकर्यांवर पावसाअभावी दुबार पेरणीची वेळ आली होती. त्यांच्या पिकांना जीवदान मिळणार असल्याने त्यांच्यावरील दुबार पेरणीचे संकट टळणार आहे. शिर्ला परिसरात आतापर्यंंंत पेरणी झालेल्या ३0 टक्के क्षेत्रात उगवलेल्या पिकांच्या कोवळ्या रोपांना या पावसाने जीवदान मिळणार आहे.
बाश्रीटाकळीत जोरदार पाऊस
By admin | Published: June 24, 2017 5:43 AM