अकोला: शुक्रवार रात्रीपासून पावसाला रिपरिप सुरूवात झाली असून, हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र बरसत असल्याचे चित्र आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने, नदी-नाल्यांना पूर आले असून, नदी, नाले दूधडी भरून वाहत आहेत. संततधार पावसानेमुळे शेतकऱ्यांच्या शेतातमध्ये पाणीच-पाणी दिसत आहे. अनेकांची शेते पिकांसह खरडून गेल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
शुक्रवार रात्रभरापासून सतत पाऊस सुरू असल्याने, अकोला शहरातील रस्त्यांवरही पाणीच-पाणी साचले आहेत. सकाळपासूनच शहरात पावसामुळे संचारबंदी लागल्यासारखे वातावरण आहे. शहरातील टिळक रोड, गांधी रोडसह इतर भागातही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नसल्याचे दिसून आले. सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांनीही आज शाळेला दांडी मारल्याचे दिसून आले. शहरातील नाल्यासुद्धा पाण्यामुळे ओव्हरफ्लो झाल्या असून, नाल्यांमधील सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे वाहनचालकांना साचलेल्या पावसात वाहने काढताना कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील पूर्णा नदी, काटेपूर्णा, मोर्णा, मन, महेश आदी महत्वाच्या नद्याही दूधडी भरून वाहत आहेत. यासोबतच जिल्ह्यातील म्हैसांग, अंबिकापूर, आपातापा, म्हातोडी, दोनवाडा, काटी-पाटी, केळीवेळी, गांधीग्राम, चोहोट्टा बाजार, घुसर, आपोती, दापूरा-मजलापूर, घुंगशी-मुंगशी, विरवाडा, कट्यार, रामगाव आदी भागातील नाल्यांना पूर आले असून, शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. काहींची शेतकऱ्यांची पिकांसह शेती खरडून गेल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे.
अनेक गावांमधील बत्ती गुलसततच्या पावसामुळे बारूला क्षेत्रातील अनेक गावांमधील बत्तीसुद्धा शुक्रवार रात्रीपासून गुल झाली आहे. अनेक गावांमधील विज शनिवारी सकाळी आली. पाऊस धो-धो बरसत असल्याने, शेतातील कामेसुद्धा रखडली आहे. पावसामुळे शेतकरी, शेतमजूर घरीच आहे.