तेल्हारा
तालुक्यात सार्वत्रिक पाऊस पडला असून मिळालेल्या माहितीनुसार कुठेही हानी झाली नाही.
तालुक्यात गेल्या २४ तासांपासून पाऊस पडत असून पावसाची केवळ रिपरिप सुरू आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला नसून शेतकरी सुखावला आहे.
गेल्या काही दिवसांत चाळीस मिमीच्या आत पाऊस झाला असून वाण धरण्याच्या जलसाठ्यामध्ये वाढ झाली नाही. तालुक्यातील पाऊस हा शेतीकरिता पूरक झाला असून शेतकरी सुखावला आहे.
मात्र, पूर्णा नदीला पूर आल्याने तालुक्यातील गौतमा व विद्रूपा या नद्यांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून या नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी तळेगाव, पातुर्डा व तळेगाव, बाभूळगाव, वांगरगाव या नदीकाठच्या गावांना प्रत्यक्षात भेटी देऊन आढावा घेतला.