शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

सहायक बीडीओंच्या अधिकारावर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2017 12:57 AM

अकोला- सहायक गटविकास अधिकाऱ्यांच्या अधिकारावर टाच आणून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे, असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे

अकोला : पंचायत समित्यांमध्ये शासनाने सहायक गटविकास अधिकाऱ्यांना पदस्थापना दिली. त्यांना कामाचे वाटपही केले. मात्र, काही पंचायत समित्यांमध्ये संबंधित कामाच्या फायली त्यांच्याकडे न जाता परस्पर गटविकास अधिकारीच निपटारा करतात. त्यामुळे सहायक गटविकास अधिकाऱ्यांच्या अधिकारावर टाच आणून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे, असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. सहायक गटविकास अधिकाऱ्यांना पदस्थापना देतानाच त्यांच्याकडे असलेल्या कामाबाबतचे आदेशही शासनाने दिले. ३० आॅक्टोबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार त्यांच्याकडे कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण तसेच पशुसंवर्धन या चार विभागांचा स्वतंत्र कार्यभार आर्थिक व प्रशासकीय बाबींसह देण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून रूजू झाल्यानंतर दलित वस्ती विकास निधी कामाच्या फायली सहायक गटविकास अधिकाऱ्यांकडे न येता परस्पर गटविकास अधिकाऱ्यांकडेच सादर केल्या जातात. त्यातून सहायक गटविकास अधिकाऱ्यांचे अधिकार डावलण्यात येत आहेत. हा प्रकार अकोट, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी पंचायत समित्यांमध्ये सुरू आहे. गटविकास अधिकाऱ्यांना सातत्याने या प्रकाराची जाणीव करून दिल्यानंतरही काहीच फरक पडलेला नाही. त्यामुळे आता अधिकारासाठी भांडण्याची वेळ सहायक गटविकास अधिकाऱ्यांवर आली आहे. टक्केवारीचा मोह सुटेना!दलित वस्ती विकास निधीतून कोट्यवधींची कामे प्रत्येक पंचायत समितीमध्ये होतात. त्या कामांची देयकं अदा करताना ठरल्याप्रमाणे टक्केवारीचे वाटप होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना या टक्केवारीचा मोह सुटता सुटत नसल्यानेच इतरांना डावलून स्वत:कडेच काम ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे.