- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पीक नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांसाठी राज्यपालांकडून शनिवारी मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार दोन हेक्टर मर्यादेपर्यंत खरीप पिकांसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. जिल्ह्यात ३ लाख ९ हजार ३४१ शेतकऱ्यांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांच्या लागवडीसाठी शेतकºयांनी केलेला खर्च आणि हाताशी आलेल्या पिकांचे बुडालेले उत्पादन बघता, पिकांचे नुकसान मोठे असून, त्या तुलनेत जाहीर झालेली मदत ही अत्यंत तुटपुंजी ठरणार आहे.गत महिनाभराच्या कालावधीत बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर इत्यादी खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले, तसेच बागायती व फळ पिकांचेही नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने शेतकरी संकटात सापडला. जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात १ हजार ४ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामध्ये जिरायत, बागायत व फळ पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी राज्यपालांकडून १६ नोव्हेंबर रोजी मदत जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत मर्यादेत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शेतकºयांना मिळणार आहे; परंतु पिकांच्या लागवडीसाठी शेतकºयांनी केलेला खर्च आणि पिकांचे बुडालेले उत्पादन लक्षात घेता, पिकांचे नुकसान प्रचंड असून, त्या तुलनेत जाहीर झालेली नुकसान भरपाईची मदत अत्यंत तोकडी ठरणार असल्याचे वास्तव आहे.दोन हेक्टरची मर्यादा; अनेक शेतकºयांवर अन्याय!पीक नुकसान भरपाईपोटी राज्यपालांकडून जाहीर झालेली मदत दोन हेक्टर मर्यादेपर्यंतच मिळणार आहे; परंतु अवकाळी पावसाच्या तडाख्यात अनेक शेतकºयांच्या दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे उत्पादन बुडाले आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाईच्या मदतीत दोन हेक्टर क्षेत्राची मर्यादा अनेक बाधित शेतकºयांवर अन्याय करणारी ठरणार आहे.अवकाळी पावसाने पीक नुकसान भरपाईची दोन हेक्टरपर्यंत मर्यादेत खरीप पिकांसाठी जाहीर करण्यात आलेली हेक्टरी ८ हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकºयांची थट्टा आहे. पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च आणि पिकांचे बुडालेले उत्पादन यासंदर्भात विचार केल्यास जाहीर झालेली मदत ही अत्यंत कमी आहे. तसेच दोन हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांवर अन्याय होणार आहे.- शिवाजीराव भरणे,शेतकरी, रामगाव, ता. अकोला.