तालुका बाधित कुटुंब बाधित व्यक्ती
अकोला ८६२० ३४४८०
बार्शिटाकळी १९७ ७८८
अकोट १९६ ७८४
तेल्हारा १९ ८१
बाळापूर ११८८ ५७५२
मूर्तिजापूर १६ ६४
.....................................................................................
एकूण १०२३६ ४१९४९
...................................................................
शेतजमीन खरडून गेलेल्या १६६४९ शेतकऱ्यांना मदत !
अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ४४१ गावांमध्ये १६ हजार ६४९ शेतकऱ्यांची ९ हजार ३८ हेक्टर ७ आर शेतजमीन खरडून गेली. शेतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३१ कोटी ४ लाख रुपयांची मदत प्राप्त झाली असून, संबंधित शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानभरपाईपोटी मदत मिळणार आहे.
...............................................
पीक नुकसानभरपाईची मदत केव्हा मिळणार?
अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात घरांचे नुकसान झालेल्या बाधित कुटुंबांसह जनावरांचा मृत्यू झालेल्या पशुपालकांना तसेच शेतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मदतनिधी प्राप्त झाला आहे. परंतु, अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात १ लाख ७८ हजार ८३ शेतकऱ्यांच्या १ लाख २१ हजार २९५ हेक्टर क्षेत्रावरील जिरायत पिकांचे, १ हजार ४१ शेतकऱ्यांच्या ५७९ हेक्टरवरील बागायत पिकांचे आणि ९०९ शेतकऱ्यांच्या ५८२ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे पिकाची नुकसानभरपाई केव्हा मिळणार, याची अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.