अकोला : शहरातील कमला नेहरू नगरमधील पूरग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत देण्याची मागणी करीत, बहुजन समाज विकास संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले.
शहरातील कमला नेहरू नगर भागातील पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळावी, यासाठी गत ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्यात आले. परंतु, पूरग्रस्त नागरिकांना अद्यापपर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्यामुळे या भागातील पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत मिळावी, या मागणीसाठी बहुजन समाज विकास संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धरणे देण्यात आले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात बहुजन समाज विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष ढोले, नवेश शिरसाट, सुमन खोळकर, प्रवीण बनसोड, शकुंतला सोनकर, अंजली सोनकर, कार्तिकी तायडे, मुगुटराव प्रभे आदी सहभागी झाले होते.
...........................फोटो......................