परिचारिकांचा सन्मान
अकोला : परिचारिका दिनानिमित्त रामनवमी शोभायात्रा समिती व भाजपतर्फे अशोकनगरीत परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आ. गाेवर्धन शर्मात, महानगर भाजप अध्यक्ष विजय अग्रवाल, आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चनाताई मसने, तेजराव थोरात, राजेंद्र गिरी, अर्चना चौधरी, विलास अनासने, शकुंतला जाधव, सुषमा शुक्ला, अर्चना गुंडेकर, मालती रणपिसे आदी उपस्थित होते.
..................................
ग्रामपंचायत सदस्याने केले गाव सॅनिटाइझ
अकोला : तालुक्यातील सांगळुद ग्रामपंचायतचे सदस्य तथा सम्यक विद्यार्थी आंदोलनचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाट यांनी सर्व गावात सॅनिटायजरची फवारणी करून सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या कीर्ती अश्विन जयस्वाल, सदस्य विशाल चिपडे, वंचितचे सक्रिय कार्यकर्ते दिलीप शिरसाट यांनी सहकार्य केले.
..................................
निर्देशाचे पालन करा : जिल्हाधिकारी
अकोला, कोविड उपचारासंदर्भात दिलेल्या सुधारित निर्देशाचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आज जिल्हाधिकारी पापळकर यांनी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधून आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभीये, उपअधिष्ठाता डॉ. कुसमाकर घोरपडे, डॉ. अष्ट्रपुत्रे, डॉ. श्यामकुमार सिरसाम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित होते.
................................
अकोला मनपाव्दारे झाेननिहाय चाचणी
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात होत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर जास्त प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी अकोला महानगरपालिका प्रशासनव्दारे झोननिहाय सुरू आलेल्या कोविविड-१९ चाचणी केंद्रांव्दारे शहरातील नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहे.
................................