अकोला: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी ८६ हजार ६२३ शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, याद्यानुसार शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात येत आहे. त्यामध्ये बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रकमेसंदर्भात जिल्ह्यातील २ हजार ८८ शेतकºयांच्या तक्रारी १४ मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या असून, कर्जखात्यांच्या तक्रार निवारणासाठी शेतकºयांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी पात्र ठरले असून, त्यापैकी बँक खाते क्रमांक, आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आलेल्या १ लाख ११ हजार ७९ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८६ हजार ६२३ शेतकºयांच्या गावनिहाय याद्या २९ फेबु्रवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यांनुसार शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू आहे. त्यामध्ये बायोमेट्रिक मशीनवर शेतकºयांच्या बोटाचे ठसे घेण्यासह बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रक्कम इत्यादी प्रकारचे प्रमाणीकरण करण्यात येत आहे. कर्जखात्यांच्या प्रमाणीकरणात बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक चुकीचा तसेच कर्जखात्यातील रक्कम चुकीची असल्याबाबत जिल्ह्यातील २ हजार ८८ शेतकºयांच्या तक्रारी १४ मार्चपर्यंत संबंधित तहसीलदार व जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये बायोमेट्रिक मशीनवर बोटाचे ठसे उमटत नसल्यास शेतकºयास संबंधित तहसीलदारांकडे तक्रार करावी लागते. तसेच बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रक्कम चुकीची असल्याच्या तक्रार निवारणासाठी शेतकºयांना संबंधित बँक शाखेचे व्यवस्थापक व सेवा सहकारी संस्थेच्या गटसचिवांकडे लेखी स्वरूपात म्हणणे सादर करावे लागते. त्यामुळे कर्जखात्यांच्या तक्रार निवारणासाठी शेतकºयांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.
शेतकºयांच्या अशा प्रलंबित आहेत तक्रारी!कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जखात्यांसंदर्भात जिल्ह्यातील २ हजार ८८ शेतकºयांच्या तक्रारी जिल्ह्यातील तहसीलदार आणि जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींपैकी १४ मार्चपर्यंत ७६२ शेतकºयांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, उर्वरित १ हजार ३२६ शेतकºयांच्या कर्जखात्यांच्या तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. त्यामध्ये जिल्हास्तरीय समितीकडे ९४२ आणि तहसीलदारांकडे ३८४ तक्रारी प्रलंबित आहेत.
कर्जखात्यांसंदर्भात जिल्ह्यातील २ हजार ८८ शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ७६२ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, १ हजार ३२६ तक्रारींचे निवारण करण्याची कार्यवाही सुरू आहे. कर्जखात्यांसंदर्भात तक्रार असलेल्या शेतकºयांनी संबंधित बँक शाखेचे व्यवस्थापक व सेवा सहकारी संस्थांच्या गटसचिवांकडे लेखी स्वरूपात म्हणणे सादर केल्यास शेतकºयांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येणार आहे.-डॉ. प्रवीण लोखंडे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)