आगर : येथील शेतकरी राजेश मनोहर फुकट यांचे काही दिवसांपूर्वी फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात पत्नी संगीता व दोन मुली प्रतिभा, मीनल व मुलगा यश आहेत. त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी प्रा. संजय खडसे उपविभागीय अधिकारी अकोला परिवारासह जावुन मुलांना कपडे दिले व दिवाळी फराळाचे साहित्य दिले .उपविभागीय अधिकारी संजय खडसे हे नेहमीच सामाजिक बांधीलकी जपत आले आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून वावरताना त्यांनी सदैव माणुसकीचा प्रत्यय दिला आहे. आगर येथील राजेश फुकट या शेतकºयाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्या कुटुंबाचा आधारच हरविला आहे. चार मुलांचे हे कुटुंब पित्याविना दिवाळी साजरी करूच शकणार नाहीत, त्यांना दिवाळीचा आनंद मनापासून घेता येणार नाही, हे वास्तव असले तरी किमान त्यांच्यावर कोसळलेल्या दु:खाचा भार कमी करण्याचा प्रयत्न खडसे यांनी या निमित्ताने केला. या कुटुंबाला कपडे व दिवाळीचे फराळ हे निमित्त असले, तरी तुमच्या पाठीशी कुणीतरी आहे, ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचावी व कुटुंबाला धीर यावा, हीच प्रामाणिक मनिषा असल्याचे खडसे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या कुटुंबाला प्रशासकीय स्तरावर संजय गांधी योजनेचा लाभ देण्यात येईल. कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत २०,००० रु. मदतीचा प्रस्ताव तयार करून मदत देण्यात येईल, या व्यतिरिक्त मुलांच्या शिक्षणाकरिता मदत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
विषबाधेतून मृत्यू झालेल्या शेतकºयाच्या कुटुंबाला दिला भावनिक आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 1:49 PM
आगर : येथील शेतकरी राजेश मनोहर फुकट यांचे काही दिवसांपूर्वी फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात पत्नी संगीता व दोन मुली प्रतिभा, मीनल व मुलगा यश आहेत. त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी प्रा. संजय खडसे उपविभागीय अधिकारी अकोला परिवारासह जावुन मुलांना कपडे ...
ठळक मुद्देएसडीओ खडसेंनी जपले सामाजिक भान