अकोट : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येचा आलेख चढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केले आहे. यामुळे गोरगरीब नागरिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा कोरोनाच्या संकट काळात अकोट येथील कलामंच व गजानन ग्रुपने पुढाकार घेत गरजू नागरिकांना घरोघरी जाऊन कपड्यांचे वाटप करीत मदतीचा हात दिला आहे.
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका गोरगरीब मजुरांना बसला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत अकोट येथील कलामंच व गजानन ग्रुपने घरोघरी जाऊन कपडे वाटप करीत मदतीचा हात दिला आहे. कोरोना योद्धा म्हणून युवक काम करीत असून, जवान देशाची सुरक्षा करीत आहेत. नागपूर येथील आनंदराव धोंगडी यांच्या स्मृती निमित्ताने लॉकडाऊन काळात कपडे वाटपाचा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मजुरांसह गोरगरीब नागरिकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जेवणासह कपड्याच्या व्यवस्थेची जुळवाजुळव करण्यासाठी अनेकांची धावपळ होत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक दायित्व म्हणून अकोट शहरातील युवकांनी योगेश वाकोडे, मुन्ना साबळे, राहुल कराळे, संजय रेळे, सुशील तायडे, साजिद भाई यांनी गरजूंना कपड्यांचे वाटप केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (फोटो)