मूर्तिजापूर: येथील गाडगे महाराज गौरव संस्थानमार्फत काकड आरतीच्या समारोपीय कार्यक्रमात गरजूंना मदत करण्यात आली. यावेळी गरजुंना भोजनदान व कपड्यांचे वितरण करण्यात आले.
गाडगे महाराज संस्थानात दरवर्षी काकड आरतीचे आयोजन करण्यात येते. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांत गायी गोंदणाच्या दिवशी अपंग असलेल्या गायीचे पूजन करण्यात आले. संस्थेमध्ये महिनाभर भजन, कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले. संत गाडगे महाराज धर्मशाळा संस्थेचे प्रमुख बापूसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत काकड आरतीचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात भजन मंडळातील सदस्य, स्वयसेवकांना ताट व ग्लासचे वाटप करण्यात आले, तसेच गरजुंना कपडे व भोजनदानाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर देशमुख, डॉ. बाळासाहेब कावरे, सुरेश बाजड, सुनील सरकटे, गजानन देशमुख, गजानन येवले, विशाल वानखडे, वसंतराव देशमुख, गोपाल पवार, संजय निंभेकर आदींनी परिश्रम घेतले. (फोटो)