अकाेला : पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही येणाऱ्या अडचणी साेडविण्यासाठी पाेलीस अधीक्षक कार्यालयात हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून, पाेलीस कर्मचारी अथवा अधिकाऱ्याने त्यांना असलेली तक्रार हेल्पलाइनवर करताच ते निकाली काढण्यात येत असल्याची माहिती आहे. अकाेल्यात या तक्रारींचे प्रमाण नगण्य असल्याची माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण हाेवाे, सण-उत्सवातील बंदाेबस्त असाे किंवा कुणाचा काैटुंबिक वाद साेडविण्यासाठी प्रत्येकजण पाेलिसांकडे जाताे. मात्र या पाेलिसांनाही येणाऱ्या अडचणी साेडविण्यासाठी एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर तक्रार येताच पाेलीस अधीक्षक जी, श्रीधर त्याकडे तातडीने लक्ष घालत या तक्रारी काही तासात किंवा एक ते दाेन दिवसात साेडवीत असल्याचे वास्तव आहे. सुट्या मिळत नाहीत किंवा तपासाच्या नावाखाली या तक्रारी येतात. मात्र गंभीर स्वरूपाच्या तक्रारी नसल्याची माहिती आहे.
२०२१मध्ये हेल्पलाइनचा वापर
जानेवारी ०२
फेब्रुवारी ००
मार्च ०३
एप्रिल ४
मे १
जून ३
जुलै २
ऑगस्ट १
तक्रारींचे झटपट निवारण
पाेलीस हेल्पलाइनवर तक्रार येताच किंवा माहिती येताच त्याचे तातडीने निवारण करण्यात येते. यासाठी यंत्रणा कामाला लावलेली असून, तातडीने प्रकरणे मार्गी लावण्यात येत आहे. हेल्पलाइनवर आलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा झाला असल्याने आता एकही तक्रार पेंडिंग नसल्याचे वास्तव आहे. या हेल्पलाइनचा राेजच फाॅलाेअप घेण्यात येत असल्याने तक्रारी तातडीने मार्गी लागत आहेत.
रजा नाही किंवा भेदभाव
पाेलीस ठाण्यात किंवा विविध कार्यालयात कार्यरत असलेल्या पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रजा वेळेत मिळत नाही तर वरिष्ठ अधिकारी भेदभाव करतात अशाच प्रकारच्या तक्रारी असतात. काही वेळा चाैकशी झाल्यास या तक्रारींमध्येही तथ्य नसल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे आता अशा तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे.
पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारी तातडीने साेडविण्यात येत आहेत. हेल्पलाइनचा वापर पाेलीस अधिकारी व कर्मचारी करीत असून, त्यावर तातडीने उपाययाेजनाही करण्यात येत आहेत. हेल्पलाइनवर तक्रार येताच संबंधितांचे तातडीने निरसन करण्यात येत आहे.
माेनिका राऊत
अपर पाेलीस अधीक्षक, अकाेला