अकोला : कोरेगांव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. यामध्ये कोणत्याही धर्माचे-जातीचे व्यक्ती दोषी असले तरी चालेल. त्याचेवर गंभीर कारवाई झाली पाहिजे, अशी रोखठोक प्रतिक्रीया कोल्हापूर येथील छत्रपतींचे १३ वे वंशज खासदास संभाजी राजे यांनी येथे दिली. गुरूवारी एका कार्यक्रमानिमित्त अकोल्यात आले असताना, आयोजित एका पत्रकार परिषदेत संभाजी राजे यांनी ही प्रतिक्रीया दिली.गोरक्षण मार्गावरील सहकार नगरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थानांतरण कार्यक्रमानंतर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आणि दलित समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत काही शक्ती करीत आहेत का, याबाबत विचारणा केली असता, ते सर्व पोलिसांच्या आणि उच्चस्तरीय चौकशीतूनच समोर येईल. फुले-आंबेडकर-शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात असल्याप्रकारच्या घटना निंदणीय आहेत. यासाठी या थोर पुरूषांचे विचार रूजविण्याची खरी गरज आहे. बहुजन समाजाने शांत राहून समाजात अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करावेत. कोरेगांव-भीमाच्या निमित्ताने दलित-मराठ्यात कुठेही वितुष्ट निर्माण होऊ नये यासाठी आपला प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत दृष्टीतूनच मी महाराष्ट्रातील अठरापगड जनतेला पाहतो. रायगड प्राधिकरणातून शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन केले जाईल. त्यातून येणार्या नवीन पिढीला शिवाजी महाराज काय होते याची कल्पना येईल. कोरेगांव-भीमाच्या घटनेप्रकरणी संभाजी भिडे- मिलींद एकबोटेंवर गुन्हा दाखल झाला मात्र अटकेची कारवाई नाही असे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, याचे उत्तर मी नव्हे पोलिस देतील, असे ते बोलले. भीमा-कोरेगांवच्या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटनांचा जोर वाढला असे वाटते काय, असेल तर सर्व चौकशीत समोर येईल, असेही ते बोलले.
कोरेगांव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी - खासदार संभाजी राजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 4:09 PM
अकोला : कोरेगांव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. यामध्ये कोणत्याही धर्माचे-जातीचे व्यक्ती दोषी असले तरी चालेल. त्याचेवर गंभीर कारवाई झाली पाहिजे, अशी रोखठोक प्रतिक्रीया कोल्हापूर येथील छत्रपतींचे १३ वे वंशज खासदास संभाजी राजे यांनी येथे दिली.
ठळक मुद्देगोरक्षण मार्गावरील सहकार नगरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थानांतरण कार्यक्रम.कार्यक्रमानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत बातमीदारांशी साधला दिलखुलास संवाद.