अकोला : अकोला परिमंडलात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी आतापर्यंत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचे एकूण ३० लाख डोस प्राप्त झाले आहेत. लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत सर्वाधिक लसीकरण अमरावती जिल्ह्यात झाले असून, अकोला आणि वाशिम जिल्हे पिछाडीवर असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. अकोला परिमंडळातील पाचही जिल्ह्यांत सध्या विविध टप्प्यातील लसीकरण सुरू असून गर्भवती महिलांच्या लसीकरणाचेही नियोजन करण्यात येत आहे. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असल्यामुळे लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्राप्त लसींचे ठरवून दिल्यानुसार जिल्हानिहाय वितरण करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ औषधनिर्माण अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी दिली आहे.
आतापर्यंत असा मिळाला साठा
जिल्हा - कोविशिल्ड - कोव्हॅक्सिन - दोन्ही मिळून प्राप्त लस
अकोला - ४,०३,४५० - १,००,९५० - ५,०४,४००
अमरावती - ५,६६,९३० - १,५५,५१० - ७,२२,४४०
बुलडाणा - ५,२४,०६० - १,६४,१६० - ६,८८,२२०
वाशीम - २,६२,१७० - १,६९,२१२ - ४,३१,३८२
यवतमाळ - ५,७०,१९० - १,१७,९३० - ६,८८,१२०
एकूण - २३,०७,३५० - ६,९८,५७० - ३०,३४,५६२
जिल्हानिहाय झालेले लसीकरण
जिल्हा - लसीकरण
अमरावती - ७,५०,०००
यवतमाळ - ६, ९९,४९५
अकोला - ४,९९,१६१
वाशिम - ४,३१,३८२
बुलाडाणा - ६,३५,७३२