--कोट--
ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य नाही. परीक्षार्थी खूप मेहनत घेत आहेत, सरकारने त्वरित परीक्षा घ्याव्या. अभिषेक जाधव, विद्यार्थी.--कोट--
कोरोनाचे कारण दाखवून ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य नसून परीक्षार्थींवर अन्याय करणारा आहे. सरकारने त्वरित परीक्षा घ्याव्यात, अन्यथा उद्रेक होणार आहे.
गोपाल काळे, विद्यार्थी.
--कोट--
एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलणं चूक आहे. सरकारने तातडीने हा निर्णय बदलायला हवा. ऐनवेळी परीक्षा रद्द कशी होऊ शकते.
अश्विनी वाहुरवाघ, विद्यार्थी.
--कोट--
मी गेल्या तीन ते चार वर्षांपासून परीक्षेची तयारी करीत आहे. परीक्षा तीन दिवसांवर असताना सरकारने ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेणे हे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांचे वय होत आहे. त्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे सरकारने त्वरित निर्णय घेऊन परीक्षा घेण्यात यावी.
राजेश जढाळ, विद्यार्थी.