अकोला : राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन २५ हजार रुपये मदतीची घोषणा केली होती. भाजप सरकारने शेतकरी हिताच्या विविध योजना अमलात आणल्या. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या कल्याणकारी योजनांना महाविकास आघाडीने स्थगिती देण्याचे धोरण आखले असून, त्यामुळे सर्वसामान्यांचा कोंडमारा होत आहे. शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसणाºया महाविकास आघाडीच्या निर्णयांचा विरोध दर्शविण्यासाठी भाजपच्यावतीने राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. याचा भाग म्हणून अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्यावतीने धरणे देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपने दिले सरकारविरोधात धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 4:36 PM