अकोला : कृषी तंत्रज्ञानात आपण प्रगतीपथावर असलो तरी जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी व्यावसायिक तंत्रज्ञान विकसीत करावे लागणार आहे.असे आवाहन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी मंगळवारी येथे केले.कृषी आणि तत्सम विषयाच्या पदव्यूत्तर व आचार्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वृध्दीगंत व्हावी, यादृष्टीने राज्यपाल कार्यालयाच्यावतीने ‘अविष्कार संशोधन महोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याचाच एक भाग म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमेटी सभागृहात संशोधन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी डॉ.भाले बोलत होेते.कार्यक्रमाला विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर, डॉ. एम.बी.नागदेवे, डॉ.पी.के.नागरे, डॉ.आर.जी.देशमुख, डॉ.ययाती तायडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.भाले यांनी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानात आपण प्रगतीपथावर आहोत असे असले तरी शाश्वत तंत्रज्ञान,संशोधनात काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. तदव्तच बाजारात खपणाºया व्यावसायिक तंत्रज्ञानाची जगाला गरज आहे. चिनने यात आघाडी घेतला आहे. जागतिक बाजारात खपणारे,विकले जाणारे तंत्रज्ञानावर आपल्याला काम करावे लागणार आहे. जागतिक महासत्तेच्या वाटेवर आपण आहोतच तथापि पूर्ण महासत्ता व्हायच असेल तर बाजारातील मागणी ओळखून जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान विकसीत करणे क्रमप्राप्त आहे अये ते म्हणाले.अविष्कार संशोधन महोत्सवाला पदव्यूत्तर,आचार्य शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. या विद्यार्थ्यांनी विकसीत केलेले नवे संशोधन,तंत्रज्ञानाची माहिती सादर केली तसेच तंत्रज्ञानाचे भिंती पत्रके आदीचे येथे प्रदर्शन लावण्यात आले आहे.कुलगुरू डॉ.भाले,डॉ.मानकर व इतर शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान पोष्टरचे अवलोकन केले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी दिवसभर आयोजित या महोत्सवात विविध तंत्रज्ञान,संशोधनावर सादरीकरण व माहिती सादर केली.विद्यार्थ्यांनी लावलेल्या या प्रदर्शनातील पत्रकांची निवड करू न येथे त्यांना गौरिवण्यात येणार आहे.