त्या हमीपत्रात असे सांगितले आहे की, जर माझ्या किंवा माझ्या शिधापत्रिकेतील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस असेल तर माझी शिधापत्रिका रद्द केली जाईल. भारतात जे ग्रामस्थ दारिद्र्य रेषेखालील राहत आहेत. त्यांना या शिधापत्रिकेमुळे स्वस्त दरात धान्य भेटते. या हमीपत्राच्या माध्यमातून सरकारने दारिद्र्य रेषेखालील लोकांची शिधापत्रिका रद्द करण्याचे धोरण आखले आहे. जर सरकारने हे हमीपत्र लिहून घेणे तत्काळ थांबविले नाही तर बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून या हमीपत्राची विरोधात मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे श्याम अवचार, देवानंद अवचार, सरदार संदीप, विजया जंजाळ, बबिता तायडे, उज्ज्वला शेगोकार, ललिता इंगळे, मीनाक्षी दाभाडे, आम्रपाली जंजाळ बहुजन मुक्ती पार्टीचे आकाश चापके आदी मान्यवर ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने हजर होते.
बहुजन मुक्ती पार्टीकडून हमीपत्राची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:20 AM