लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मानधनात वाढ करण्यासाठी आंदोलन करीत असलेल्या अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर मानधनात अत्यल्प वाढ करणार्या शासन अध्यादेशाची (जीआर)ची होळी करून निषेध व्यक्त केला. राज्यभरातील ९७ हजार अंगणवाडी सेविका आणि तेवढय़ाच मदतनीस व १२ हजार मिनी अंगणवाडी सेविका त्यांच्या मागण्यांसाठी संपावर आहेत. गत आठवड्यात या कर्मचार्यांच्या मानधनात एक हजार रुपयांची अत्यल्प वाढ करण्यात येऊन तसा ‘जीआर’देखील काढण्यात आला; परंतु ही वाढ मान्य नसल्याने अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन अकोला यांच्यावतीने जिल्हाभरात ठिकठिकाणी या अन्यायकारक ‘जीआर’ची होळी करण्यात आली. बुधवारी संघटनेच्या कर्मचार्यांनी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयासमोर या ‘जीआर’ची होळी केली. या आंदोलनाचा भाग म्हणून बुधवार, २७ सप्टेंबर रोजी मुंबई येथील मंत्रालयावर दोन लाख अंगणवाडी कर्मचारी विराट मोर्चा काढणार आहेत. यावेळी सुरेखा ठोसर, रमेश गायकवाड, नयन गायकवाड, संतू अंभोरे, नलिनी पोहरे, मुमताज, सुधा तायवाडे, ज्योती धस, मीरा ढगेकर, हाजरा फिरोज खान, शोभा इंगळे, यशोदा थोरात, वनिता मेश्राम, शालू गाडे, वंदना राऊत, उषा गोपनारायण, रेखा इंगळे, रेखा बोदडे, माया आठवले, मीनाक्षी भामुद्रे यांच्यासह जिल्हाभरातील अंगणवाडी, बालवाडी सेविका उपस्थित होत्या.
अंगणवाडी सेविकांनी केली ‘जीआर’ची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 8:25 PM
अकोला : मानधनात वाढ करण्यासाठी आंदोलन करीत असलेल्या अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर मानधनात अत्यल्प वाढ करणार्या शासन अध्यादेशाची (जीआर)ची होळी करून निषेध व्यक्त केला.
ठळक मुद्देमानधनात वाढ करण्यासाठी आंदोलनालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर व्यक्त केला निषेध