बुलडाणा : ९ ऑगस्ट या क्रांती दिनी देशभरात हुतात्म्यांना अभिवादन करून मानवंदना दिली जाते. बुलडाण्यात मात्र ८ ऑगस्टच्या मध्यरात्रीच हुतात्मा स्मारकावर दिपप्रज्वलन करून अभिवादन केले जाते. गेल्या २२ वर्षापासुन ही परंपरा अविरत सुरू असून राज्यातील एकमेव उपक्रम आहे. बुलडाण्याच्या भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक कोर्डे गुरूजी यांनी सन १९९२ मध्ये ही परंपरा सुरू केली. शहरातील हुतात्मा गोरे स्मारकावर ८ ऑगस्टच्या मध्यरात्री विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, स्वयंस्फुर्तीने आलेले नागरीक यांच्या उपस्थितीत रात्री ठिक बारा वाजता मेणबत्ती पेटवून तसेच पुष्पचक्र वाहून हुताम्यांना अभिवादन केले जाते. यावेळी भारत विद्यालयाचे अध्यक्ष हर्षवर्धन आगाशे हे ह्यवेद मंत्राहून आम्हा वंद्य वंद्य मातरम्ह्ण स्व:ता हे गित सादर करतात. या गितानंतर उपस्थितांना शपथ दिली जाते. कुठलीही भाषण बाजी नाही, दिखाऊपणा नाही अतिशय उत्स्फरुतपणे होत असलेल्या या कार्यक्रमात नागरीक स्वयंस्फुर्तीने सहभागी होतात. पुर्वी या कार्यक्रमासाठी मशाली, टेंभे घेऊन हुतात्मा स्मारक गाठल्या जात असे मात्र रात्रीच्या मिरवणुकांवर तसेच, वाद्य वाजविण्याबाबत आलेल्या नियमांमुळे स्मारकावरच मेणबत्ती प्रज्वलीत केल्या जातात.
** बिगुलची सलामी नाही
सवरैच्च न्यायालयाने रात्री १0 ते सकाळी ५ पर्यंत वाद्य वाजवायला बंदी घातल्यामुळे या कार्यक्रमातुन बिगुलची सलामी बंद झाली. पुर्वी बुलडाणा पोलीसमधून बिगलर येत असत मात्र ही परंपरा आता बंद झाली.