शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील अकोला-पातूर महामार्गावरील सोळा मैल वस्तीमध्ये सटवाजी रामचंद्र बळकार (७०) व जनाबाई सटवाजी बळकार (६५) हे दाम्पत्य राहतात. अकोला येथून शिर्ला येथे येत असताना, सैनिक सुरेश बळीराम इंगळे आणि त्यांचा मित्र रतन इंगळे यांना घराला आग लागल्याचे दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता करता, जळत्या घरातील वृद्ध कुटुंब आणि बकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी घरामागील भिंत तोडली. सर्वांना जळत्या घरातून बाहेर काढले. त्यानंतर महामार्गाचे काम चालू असलेल्या टँकरला तेथे आणून घराची आग विझविली. त्यामुळे वस्तीतील उर्वरित घरेही आगीपासून बचावली. जनाबाई सटवाजी बळकार यांचा आगीत हात भाजला.
आगीत सटवाजी रामचंद्र बळकार यांच्या घरातील धान्य व जीवनावश्यक वस्तू जळाल्या. या वृद्ध गरीब दाम्पत्याला समाजासह शासनाने मदत करावी, अशी मागणी होत आहे.
फोटो: